![]() |
येस बँकेत घोटाळा: सीबीआयचं पथक वधवान बंधुंना घेऊन चौकशीसाठी महाबळेश्वरात |
सीबीआयचे पथक वधवान बंधूंना घेऊन आज चौकशीसाठी महाबळेश्वर येथे आले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून वाधवान हाऊसमध्ये या बंधुंची चौकशी सुरु आहे.
येस बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असलेले उद्योगपती धीरज व कपिल वाधवान यांना मागील आठवड्यात सीबीआयने अटक केली आहे. त्यांना मुंबई येथील सीबीआय न्यायालयात हजर केले असून सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी दोन्ही बंधूंना सीबीआय पथक आज महाबळेश्वर येथे घेऊन आले आहे.
या चौकशीदरम्यान सायंकाळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर महाबळेश्वर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, या चौकशीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
0 comments:
Post a Comment
Please add comment