महाराष्ट्रातील परवानाधारक वाईन शॉप्समध्ये ४३ कोटी ७५ लाखाची मद्यविक्री

महाराष्ट्रातील परवानाधारक वाईन शॉप्समध्ये ४३ कोटी ७५ लाखाची मद्यविक्री
महाराष्ट्रातील परवाना धारक वाईन शॉप्समध्ये ४३ कोटी ७५ लाख रुपयांची मद्यविक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाउन कालावधीत सीलबंद मद्यविक्री करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे आहेत. या तत्त्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा वगळून) काही जिल्ह्यांमध्ये परवानाधारक जिल्ह्यांमध्ये सशर्त विक्री सुरु आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे. दरम्यान सशर्त संमती दिल्यानंतर आत्तापर्यंत १२.५० लाख लिटर मद्यविक्री झाली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत ४३ कोटी ७५ लाखांची मद्यविक्री देशभरात झाली आहे अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
किरकोळ मद्यविक्री सुरु असलेल्या जिल्ह्यांची नावं
पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा
किरकोळ मद्यविक्री सुरु न केलेल्या जिल्ह्यांची नावं

सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, नागपूर व गोंदिया

किरकोळ मद्यविक्रीची संमती मिळाली होती पण परवानाधारक मद्यविक्री बंद करण्यात आलेली शहरं
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, उस्मानाबाद व लातूर
किरकोळ मद्यविक्री सुरु होण्याची शक्यता असलेले जिल्हे
रत्नागिरी आणि अमरावती
राज्यात २४ मार्च २०२० पासून राज्यात लॉकडाउन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.०५ मे २०२० रोजी राज्यात १२१ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ६२ आरोपींना अटक करण्यात आली असून २९ लाख ८० हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २४ मार्च २०२० पासून दि. ५ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ४७५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून २०६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ४३० वाहने जप्त करण्यात आली असून १२.५३ कोटींचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३. हा असून हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment