पुण्यात पाच, मुंबईत तीन नवे करोनाग्रस्त; महाराष्ट्राचा आकडा २१५
आर्थिक आघाडीवर दोन हात करणाऱ्या भारतासमोर करोनानं वेढा देत मोठं आव्हान उभं केलं आहे. करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढायला लागल्यानंतर आधी महाराष्ट्र सरकारनं, तर नंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केलं. आठवडाभरापासून देश घरातच वावरतो आहे.
|
पण, सुरक्षित राहायचं असेल तर घरातच बसा, असं सांगणारी आकडेवारी समोर येत आहे. राजधानी दिल्लीत रविवारी म्हणजे एकाच २३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment