![]() |
Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 |
पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 17 मार्चला या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. नेदरलॅंड आणि फ्रान्सहूनही व्यक्ती जाऊन आली होती.
नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे. ही महिला 15 मार्चला पुण्यात पोहचली आणि 17 मार्चला तपासणी झाली असता तीला नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. काल रात्री उशीरा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.
देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment