![]() |
HDFC ने व्याजदरात केली कपात |
एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.
करोना संकटामुळे मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत. मंगळवारी (दि.21) एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.15% कपात करण्याचे जाहीर केले. एचडीएफसीने, गृह कर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% दरम्यान असतील.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून विविध कंपन्यांचे तिमाही नकारात्मक आले असताना एचडीएफसीने मात्र चांगली कमाई केल्याचे दिसून आले. गेल्या तिमाहीत एचडीएफसीचा नफा वाढला आहे. चौथ्या तिमाहीत(जानेवारी ते मार्च) बँकेचे व्याजातील उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.5 टक्क्यांनी वाढत 15,204.06 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. चौथ्या तिमाहीत या कालावधीत बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.72 टक्क्यांनी वधारुन 6,927.69 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment