येस बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1 हजार 400 अंकांनी कोसळला

येस बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1 हजार 400 अंकांनी कोसळला
येस बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1 हजार 400 अंकांनी कोसळला

शेअर बाजार शुक्रवारी उघडताच शेअर्स गडगडल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच आज सेन्सेक्स तब्बल 1100 अंकानी गडगडला आहे. डॉलरची किंमत 74 रुपये झालं आहे. तर निफ्टी 381 अंकांनी कोसळली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात उसळी होती मात्र शेवटच्या दिवशी मोठ्य़ा प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 1 हजार 67 अंकांनी घसरून 37, 404 अंकानवर आहे तर निफ्टी 325 निर्देशांकांनी घसली असून 10, 944 अंकांवर आहे. येस बँकेचे शेअर्स तब्बल 25 टक्क्यांनी घसल्याचं पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर घाललेल्या आर्थिक निर्बंधांमुळे हा फटका बसल्याचं शेअर मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे यांचं म्हणणं आहे. या आधी कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजाराला मोठा फटका बसला होता आणि सोनं तेजीत आलं होता. आता येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे बाजार उघडताच शेअर घसरल्याचं पाहायला मिळत आहे.
आरबीआयनं येस बँकेवर असे काय निर्बंध घातले?
येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळणार आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे.
येस बॅंकेविरोधात 5 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत सर्व कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे.
एखाद्या व्यक्तीचे बँकेत एका पेक्षा जास्त खाते असतील तरीही त्याला एकूण 50 हजार रुपयेच विथड्राल करता येतीस
बँकेद्वारे जारी केलेल्या कोणत्याही मसुद्यावर पे ऑर्डरवर 50 हजार रुपये कॅप लागू नाही.
अप्रत्याशित वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत ठेवीदारांना पैसे काढता येणार आहेत.
अवलंबितसाठी शैक्षणिक फी असल्यास 50 हजार रुपये ठेवीदार पैसे काढू शकतो.
50 हजार रुपये स्वत:साठी, अवलंबितांसाठी विवाह खर्च भरण्यासाठी कोणत्याही अनिवार्य आपत्कालीन परिस्थितीत ठेवीदार पैसे काढू शकतात.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment