श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा आज 23 वा वाढदिवस. 'धडक' सिनेमातून दमदार डेब्यू करणारी जान्हवी त्या अगोदरच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती.
2018 मध्ये जान्हवीनं इशान खट्टरसोबत धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याआधी ती अक्षत रंजनसोबतच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली होती. अक्षत हा तिचा बालमित्र आहे.
जान्हवीच्या 21 व्या वाढदिवसाला अक्षतनं त्याच्या इन्स्टाग्रामवर जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्याच्या कमेंटमध्ये जान्हवीनं आय लव्ह यू असं लिहिलं होतं. त्यानंतर त्याच्या नात्याच्या चर्चा सुरू झाली होती.

या नंतर अक्षतच्या प्रोफाइलवर जान्हवीचे फोटो सतत दिसू लागले होते. सूत्राच्या माहितीनुसार जान्हवी अक्षतला डेट करत होती. मात्र तिनं मीडियासमोर हे नातं कधीच मान्य केलं नाही.
0 comments:
Post a Comment
Please add comment