![]() |
politics comedy: बाळासाहेब फड भाजपा युवा मोर्च्या यांची अजित पवारवर सडकून टिका |
एकदा मी लोणावळ्याला टू व्हीलर वरून चाललो होतो,
भक्तीशक्ती चौकात एकाने हात केला, चेहरा ओळखीचा वाटला, गाडी थांबवली तर आमदार साहेब, म्हणले लिफ्ट देता का मुंबईपर्यंत अधिवेशनाला जायचं आहे,
मी लोणावळ्याला चाललोय सांगितल्यावर म्हणले, लोणावळ्यापर्यंत दिली तरी चालेल, म्हटलं बसा,
गाडीवर बसल्यावर त्यांनी मला सांगितले, त्यांच्याकडे गाडी नाही म्हणून ते असे लिफ्ट मागून ये जा करतात,
कामशेत ला पोहचलो असेल तर दोन जण चालत चालले होते, त्यांना आमदार साहेबांनी ओळखले, आम्ही गाडी थांबवली,
"आज पायीच?"
"हो, कोणी लिफ्टच देईना आणि पैसे पण नाहीत खिशात, अधिवेशन महत्वाचं
जनतेचे प्रश्न महत्वाचे, उशीर नको म्हणून निघालो पायीच"
आम्ही पुढं गेल्यावर आमदार साहेबांनी कानात सांगितले, हे पण दोघे आमदारच आहेत, आम्हाला वाईट वाटलं,
पुढं लोणावळ्यात चार बाकीच्या पक्षांचे आमदार भेटले, त्यांच्याकडे पुणे लोणावळा लोकल पुरते पैसे होते, त्यामुळं ते तिथपर्यंत लोकलने आले होते,
पुढं पायीच निघणार आहोत, असं त्यांनी सांगितले,
माझ्या बरोबर आलेले आमदार साहेब पण मला धन्यवाद देऊन त्यांच्यामध्ये सामील झाले,
त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट समजली की जवळपास सर्वच आमदारांची अशीच अवस्था आहे,
काही आमदार नाशिक मार्गे तर कोकणातले गोवा हायवे ने असेच लिफ्ट मागून नाहीतर चालतच मुंबई गाठतात.
मला सुरवातीला उर भरून आला, पण नंतर वाईट वाटलं, आपल्या महाराष्ट्रातील जनता ही स्वतःची गाडी नसलेले आमदार का बरं निवडून देत असेल हा पण प्रश्न पडला,
ही स्थिती अजितदादांच्या कानावर पडली
साहजिकच अर्थमंत्री असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष देण्याचे आश्वासन दिले
आणि या अधिवेशनात आमदारांना गाडी घेण्यासाठी ३० लाख रु. बिनव्याजी देणार ही घोषणा केली,
आंनद वाटला,
गेला बाजार महागड्या अल्टो, मारुती 800, वॅगन आर, क्विड अशा गाड्या न घेता आल्या तरी निदान कमीतकमी फॉरचूनर सारख्या स्वस्तातल्या गाड्या घेऊन सर्व आमदार विकासाचा वेग वाढवतील याची मनोमन खात्री पटली.
आपला
बाळासाहेब फड
भाजपा युवा मोर्च्या शहर उपाध्यक्ष परळी शहर
politics comedy
politics comedy
0 comments:
Post a Comment
Please add comment