corona 3ds max:IIT चे ८ विद्यार्थी निरीक्षणाखाली |
आयआयटी रूरकीमधील ८ विद्यार्थ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यात एका विदेशी विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्या आयआयटीच्या गेस्ट हाउसमध्ये ठेवण्यात आले आहे.
निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले सर्व आठ विद्यार्थी हे अलिकडेच विदेशात जाऊन आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. संबंधित विद्यार्थ्यांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल, अशी महिती आयआयटी रूरकीच्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, कॅम्पस परिसर करोनापासून सुरक्षित असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. आयआयटीत आतापर्यंत एकही करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, असं आयआयटी रूरकीचे संचालक ए.के. चतुर्वेदी यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या ११०पर्यंत पोहोचली आहे. उत्तरखंडमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एक, एक रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिलीय. तर दिल्ली आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक अशा दोन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
corona 3ds max
0 comments:
Post a Comment
Please add comment