नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने करोनाशी लढण्यासाठी नामच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये पाठवणार आहोत असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
“नमस्कार मी नाना पाटेकर, या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटं नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी ५० लाख पाठवणार आहोत. तुम्हीही तुमचा वाटा उचलाल याची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे या क्षणाला. एवढी मेहरबानी करा. धन्यवाद! ”
0 comments:
Post a Comment
Please add comment