![]() |
छत्तीसगढमधे आता १४ नाही तर २८ दिवसांचं होम आयसोलेशन |
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सर्व राज्य सरकारदेखील आपापल्या पातळीवर योग्य ती पावलं उचलत आहेत. यादरम्यान करोनाच्या संशयित रूग्णांबाबत छत्तीसगढ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाच्या संशयितांना १४ नाही तर २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, सुकमा जिल्ह्यात तेलंगणहून आलेल्या अनेक गावकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी १०० बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं आहे, शेजारी राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता छत्तीसगढ सरकारच्या निर्देशाप्रमाणे करोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगण सरकारनंही करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment