![]() |
CoronavirusOutbreaks | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार |
जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
तप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देशातील जनतेशी संवाद साधायचा आहे. आज, 24 मार्च रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे.'
पहिल्यांदाच पंतप्रधान एकाच गोष्टीसाठी दोन वेळा देशातील जनतेशी बोलणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीही नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. 18 मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदींनी देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं होतं. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे, तसेच याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील मोदींनी केलं होतं.
0 comments:
Post a Comment
Please add comment