CoronavirusOutbreak | प्रसिद्ध फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन |
जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. चीनमधून पसरलेला हा आजार संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरला आहे. अशातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनेदेखील या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. एवढचं नाहीतर अनेक देशांनी शाळा, महाविद्यालयं, मॉल्स, बाजारपेठा आणि गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कोरोनाच्या महामारीचा फटका क्रिडाविश्वालाही बसला आहे. अशातच अनेक सेलिब्रिटींसह खेळाडूही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. पण प्रसिद्ध फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने याहीपेक्षा पुढे जाऊन कोरोना ग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सध्या पोर्तुगालचा स्टार कर्णधार आणि ज्युवेंट्स क्लबचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सीरि ए लीग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्यामुळे मायदेशी परतला आहे. रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबियांसोबत आहे. रोनाल्डोने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
रोनाल्डोने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आज जग कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी प्रत्येकानं स्वतःची नेहमीपेक्षा अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मी आज तुमच्याशी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, एक बाप म्हणून सवांद साधत आहे. मी सर्वांना विनंती करतो की जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. एखाद्याचं आयुष्य वाचवणे हे प्राधान्य आहे.'
संबंधित बातम्या पाहा
संबंधित बातम्या पाहा
0 comments:
Post a Comment
Please add comment