![]() |
2020 टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकललं जाण्याची शक्यता |
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर अनेक रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आता कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता 2020 टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलणं जवळपास निश्चित झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑलिम्पिक नियोजित वेळेनुसार घेण्यावर ठाम असलेलं जपान सरकार आता ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या विचारात आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी “सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक्स समितीवरील वाढत्या दबावामुळे त्यांनी देखील मान्य केलं आहे की कोविड-19 च्या वाढत्या संकटामुळे टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो”.
तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले की, 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात खूप अडचणी येत आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आम्ही लवकरच निर्णय घेऊ. 24 जुलै पासून या खेळाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुद्धा सांगितलं आहे की, अशी परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांना स्थगित केलं जाऊ शकतं.
टोकियोमध्ये 24 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा खेळावण्यात येणार आहे. पण आता ऑलिम्पिकचं आयोजन कोरोनाच्या सावटाखाली आलं आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. अखेर आता जपान सरकार ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. दरम्यान ऑलिम्पिकमधून कॅनडापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ऑलिम्पिक कमिटीनेही आपला संघ ऑलिम्पिकला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment