RCB खेळाडू केन रिचर्डसनला करोनाची लागण

करोनामुळे अनेक ठिकाणी क्रिकेट सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. संक्रमणाच्या भितीमुळे क्रिकेट समितीनं हा निर्णय घेतला आहे. नुकताच्या हाती आलेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. त्याला सध्या संघापासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान खेळाडू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं रिचर्डसनला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. केनला काही दिवसांपूर्वी खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तापसणी करण्यात आली. यामध्ये त्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले झाले आहे. सध्या रिचर्डसनला संघापासून वेगळं ठेवण्यात आलं असून तो देखरेखीखाली आहे.
करोनाची लागण झाल्यामुळे केन आगामी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याशिवाय आयपीएललाही तो मुकण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. केन रिचर्डसनला आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतोय. चांगला गोलंदाज संघापासून दूर गेल्यास विराट कोहलीला चांगलाच फटका बसणार आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होण्याची चिन्हे आहेत. ‘आयपीएल’चे सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यासंदर्भात येत्या शनिवारी प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. त्यानंतर ‘बीसीसीआय’चे धोरण स्पष्ट होऊ शकेल. ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला २९ मार्चपासून मुंबईत प्रारंभ होणार होता. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्य शासनांनी अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या सामन्यांसंदर्भात चिंता प्रकट केली आहे.

सरकारने पर्यटक व्हिसासाठी निर्बंध घातल्यामुळे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत ‘आयपीएल’मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. केंद्र सरकारने बुधवारी राजनैतिक अधिकारीोणिकर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व पर्यटक व्हिसा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. ‘आयपीएल’साठी ६० परदेशी खेळाडू आणि मार्गदर्शक करारबद्ध आहेत. ‘‘परदेशी खेळाडूंना ‘आयपीएल’साठी भारतात येताना व्यावसायिक व्हिसा घ्यावा लागतो. परंतु सरकारच्या निर्देशामुळे त्यांना ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

विश्वचषकातील अंतिम लढतीच्या साक्षीदाराला करोनाची लागण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ मार्च रोजी झालेला आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्याचा थरार ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवणाऱ्या चाहत्यालाच करोनाची लागण झाली आहे. ‘‘मेलबर्न क्रिकेट मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यालाच करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. मात्र त्याच्यामुळे इतरांना करोनाचा संसर्ग झालेला नाही. आरोग्य आणि मनुष्य सेवा विभागाने या व्यक्तीवर पुढील उपचार करण्याचे आदेश दिले आहेत,’’ असे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment