मोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार

महाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांवर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजपने ऍक्शन प्लॅन आखल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर या नाराज नेत्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपकडून या नेत्यांच्या नाराजीची दखल घेण्यात येणार असल्याचं दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी बीडमधील गोपीनाथ गड इथं झालेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. तसंच भाजपमधील नाराज आपला वेगळा गट निर्माण करू शकतात, असंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांत पक्षाला फटका बसून नये यासाठी भाजप नेतृत्वाने या नाराज नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आगामी काळात या नेत्यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
अंतर्गत युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी फडणवीस सरसावले
जपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात जळगावमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जळगावमधील भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. एकनाथ खडसे यांची वाढती नाराजी भाजपसाठी घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कण्ट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. आधीच सत्ता हातातून गेल्यानंतर या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पक्ष अधिक संकटात जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

 

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment