corona treatment कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह, कुटुंबाची चिंता वाढली |
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. आतापर्यंत तीनवेळा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चौथ्यांदा टेस्ट केली असता हा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. रिपोर्टनुसार, डॉक्टर तिच्या तब्येतीत सुधार असल्याचं म्हणत आहेत.
कनिका कपूर लंडनहून भारतात आली होती. लंडनहून भारतात आल्यावर तिला ताप येऊ लागला. यानंतर तिची टेस्ट केली असता ती करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तिचे टेस्ट सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे तिच्या कुटुंबात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.कनिका कपूरच्या कुटुंबाच्या मते, ती ट्रीटमेन्टला योग्य तो प्रतिसाद देत नाही.
तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले की, तिचे रिपोर्ट सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला तिची काळजी आहे. ती ट्रीटमेन्टला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीये आणि लॉकडाउनमध्ये अॅडवान्स ट्रीटमेन्ट तिला एअरलिफ्टही करू शकत नाही. त्यामुळे फक्त ती लवकर बरी होण्याची प्रार्थना करू शकतो.
About Gosip4U
Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.
0 comments:
Post a Comment
Please add comment