शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! |
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याला पाचवी मुलगी झाली. त्याने आपल्या मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विटरवर ट्विट केला. आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत असं शाहीदने म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेण्यात येते आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.
१२ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोला ५ हजारांवर रिट्विट्स मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्सही आले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी शाहीद आफ्रिदीला सल्ले देत त्याच्यावर टीका केली आहे. ट्विटर इंडियावरही Afrdi हा ट्रेंड चांगलाच चालतो आहे.
‘शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? निरक्षर कुठला!’ ‘बास्केटबॉलची टीम तर झाली आता क्रिकेटची टीम बनावयाची आहे का?’ ‘तुला कुटुंब नियोजनाची गरज आहे’ असे सल्ले देत आफ्रिदीला ट्विटरवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment