दिव्यांग विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा बोलक्या कम्प्युटरद्वारे

दिव्यांग विद्यार्थ्यांना  बारावीची  परीक्षा बोलक्या कम्प्युटरद्वारे

येत्या मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेत कांदिवली येथील टी. पी. भाटिया ज्युनिअर कॉलेजमध्ये कला शाखेतील भाव्या शहा या दृष्टिहीन विद्यार्थिनीला कम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा मिळावी, अशी मागणी कॉलेजने केली होती. ती मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने मान्य केली आहे.


दहावी व बारावीच्या परीक्षेला दिव्यांग विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यात आता कालानुरुप बदल होऊ लागले असून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जाऊ लागली आहे. मागील वर्षी बारावीच्या एका विद्यार्थिनीने टॅबवरून परीक्षा दिली होती, तर यावर्षी एका दृष्टिहीन विद्यार्थिनीला बोलक्या कम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा देण्यात आली आहे.

एनव्हीडीए हे खास दृष्टिहीनांसाठी विकसित करण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे. यामध्ये ई-स्पीक हे विशेष तंत्रज्ञान वापरले जाते. याद्वारे कम्प्युटरच्या स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखविला जातो. तसेच ब्रेललिपी वाचणेही या सॉफ्टवेअरमध्ये शक्य होते. या विद्यार्थिनीने सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून त्यावर बारकोड लावला जाईल. तसेच त्यावर परिक्षार्थी आणि केंद्र संचालकांची स्वाक्षरी घेतली जाईल. त्यानंतर पीडीएफ फाइल तयार केली जाईल. तसेच उत्तरपत्रिकेची प्रिंट काढल्यानंतर ती कम्प्युटरवरून डिलिट करण्यात येईल. शिवाय ही उत्तरपत्रिका कार्यालयात वेगळी जमा केली जाईल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment