खनिज तेल आणखी महागणार

मुंबई : ईराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हा अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. या वृत्तानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले केले असून त्याचे तात्काळ परिणाम जागतिक कमोडिटी बाजारावर उमटले. कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव ३ डॉलरने वाढला आहे. तो ६९.१६ डॉलर प्रति बॅरल असून गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक आहे. यामुळे भारताची तेल आयात खर्चिक बनणार असून पेट्रोल डिझेल आणखी महागण्याची शक्यता आहे.
सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. या हल्ल्यात ईराणचे समर्थन असलेला पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस हा देखील मारला गेल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे पडसाद खनिज तेलावर उमटतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला असून मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण हा जगातील आघाडीचा खनिज तेल उत्पादक देश आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेल पुरवठा थांबवल्यास त्याची मोठी झळ भारताला बसण्याची शक्यता आहे. भारत इराणकडून खनिज तेलाची आयात करतो.

खनिज तेलाच्या किमतीत शुक्रवारी ४ टक्क्याची वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ४.४ टक्के म्हणजेच ३ डॉलरने वाढून ६९.१६ डोलवर गेला आहे. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव ४.३ टक्क्याने वाढला आणि ६३.८४ डॉलर प्रति बॅरलवर गेला आहे. इंधन दरवाढीने मालवाहतुकीचा खर्च वाढेल. डिझेल महागल्यास सार्वजनिक वाहतूक दरवाढीची शक्यता आहे.
तब्बल पाच लाख कोटींची आयातभारत खनिज तेलाचा जगातील तिसरा मोठा ग्राहक देश आहे. दरवर्षी खनिज तेल आयातीसाठी पाच लाख कोटी खर्च केले जातात. देशांतर्गत एकूण इंधनांच्या ८४ टक्के तेल आयात केले जाते. भारत इराण आणि सौदी अरेबिया, ब्राझील आणि इतर देशांकडून खनिज तेलाची खरेदी करतो. देशात वर्षाकाठी २९०० कोटी लीटर पेट्रोल आणि ९००० कोटी लीटर डिझेलचा खप होतो. खनिज तेल महागल्यास आयात बिलात मोठी वाढ होते. परिणामी कंपन्यांकडून इंधन दरवाढ केली जाते.

आजही पेट्रोल-डिझेल महागले
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीने खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर खनिज तेलाच्या किमतीत ४ टक्क्यांची वाढ झाली.
पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या वर्षातील इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये ७ ते १० पैसे आणि डिझेल दरात १२ ते १५ पैसे वाढ केली. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेल महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोल ८०.९४ रुपये आणि डिझेल ७१.५६ रुपये झाला आहे.दिल्लीत पेट्रोल ७५.३५ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर ६८.१५ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ७७.९४ रुपये आणि डिझेलसाठी ७०.६१ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.त्याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७८. २८ आणि डिझेल ७१.५६ रुपये आहे. बुधवारी कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलींडरचा दर १९ रुपयांनी वाढवला होता. जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा दर जितका तर असेल त्यात आयात खर्च आणि नफा धरून कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केला जातो. 
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment