|| शाहिद जवान अमर रहे ||जैसलमेर (राजस्थान)येथे युद्धाभ्यासात जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर वय-26 शहीद झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली.  धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील परमेश्वर हे रहिवासी होते. 514 वायुसेना रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. अंकुश वळकुंडे (सुभेदार)यांनी दिलेल्या माहितीवरुन बुधवारी दुपारनंतर शहीद परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव घागरवाडा येथे पोहोचणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
राजस्थानमध्ये  ऐकून आठ सैनिक शाहिद झाले असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राचे परमेश्वर जाधवर हे एक होते . या घटनेने परमेश्वर बाळासाहेब  जाधवर यांच्या कुटुंबासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यच्या खासदार डॉ . प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी शाहिद जवान परमेश्वर जाधवर याना फेसबुक ट्विटरवरती श्रद्धांजली वाहून शाहिद कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्या आहेत. त्यानी सोसिअल मीडियावर श्रद्धांजली  दिली...
"भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले बीड जिल्ह्याचे सुपुत्र परमेश्वर जाधवर यांना राजस्थान मध्ये प्रशिक्षणा दरम्यान वीरमरण आले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या दुःखातून सावरण्यास परमेश्वर जाधवर यांच्या कुटुंबियांना बळ मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना."
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment