भटके विमुक्त जाती जमातीच्या विकासात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे योगदान


                                                    


प्रस्तावना — 
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब (१२/१२/१९४९ - ०३/०६/२०१४) हे नाव स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठवाड्यातून राज्य व देश पातळीवर महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या नेत्यांच्या यादीत अग्रक्रमाने येते. शिक्षण,सहकार,ऊर्जा,कृषी,कायदा व सुव्यवस्था,सामाजिक समरसता,विविध सामाजिक व राजकीय चळवळी इत्यादी सर्वच क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत अनमोल आणि अविस्मरणीय आहे.या देशात भटके विमुक्त व ओबीसी मधील उपेक्षित आणि वंचित जातीजमातींना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय गोपीनाथजी मुंडे यांनाच जाते.एखाद्या राजकीय पक्षात उपेक्षित,वंचितांना घेण्यासाठी विविध अघाड्या स्थापन करून त्यांना समाजिक व राजकीय व्यासपीठ देण्याचे श्रेय या देशात फक्त णि फक्त गोपीनाथजी मुंडे यांनाच जाते.कोणतीही सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी  नसलेल्या अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म बीड या डवळणाच्या जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात झाला.उसतोड कामगाराचा मुलगा,उसतोड कामगारांचा नेता,मुकादमांचा नेता,साखर कारखान्याच्या मालक,साखर सम्राट,सहकार सम्राट,जिल्हा परिषद सदस्य,मदार, उपमुख्यमंत्री,खासदार,लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी त्यांची प्रदीर्घ राजकिय कारकीर्द ही सतत प्रेरणा देणारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार दिला मात्र आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग गोपीनाथजी मुंडे साहेबांनी दाखविला.

गोपीनाथजी मुंडे यांचे बहुजन समीकरण:-

राज्यातील प्रस्तापित राजकीय समीकरणांना धक्का देत एक नवीन सूत्र निर्माण करणारे ते एक वादळ होते.सर्व प्रकारच्या विचारसरणीचे ते एक अजब असे मिश्रण म्हणजेच "गोपीनाथवाद" होते जे कुणालाही कधिच परके वाटले नाही.यामुळेच त्यांनी सर्वाना सोबत घेउन राज्यात पहिल्यांदाच "बहुजन" नावाचे ऐक नविन समिकरण तयार केले जे अत्यंत प्रभावी होते.या उपेक्षित व वंचित राजकिय सत्तेपासून नेहमी दुर ठेवलेल्या समाजात त्यांनी स्वअस्मितेचे णि सत्तेचे एक स्फुलिंग निर्माण केले होते.गोपीनाथजी मुंडे यांचे भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठीच्या योगदानाचा वाका फार मोठा हे.या चळवळीचा इतिहास त्यांच्याशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.त्याचाच थोडक्यात ढावा या लेखात घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला हे.

मंडल योगाच्या शिफारसी व लढ्यात योगदान:-

ओबीसी समाजाच्या अभ्यासासाठी णि उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापित केलेल्या मंडल योग व त्याच्या शिफारसी लागू करण्यासाठी उभारलेल्या लढ्यात एक अग्रस्थानी असलेल नांव म्हणजे गोपीनाथजी मुंडे.याच दरम्यान ओबीसींचा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली.त्यानंतरच्या काळात त्यांनी माधवंम(माळी-धनगर-वंजारी-मराठा) हा प्रयोग राबविला,त्याचबरोबर भटके विमुक्त,ग्री,कोळी,कुणबी,तेली,साळी इ.यांना सोबतीला घेतले णि प्रखर संघर्षातून,राज्यात १९९५ मध्ये सत्तांतर घडवून णले.

भटके विमुक्त समाज णि गोपीनाथजी मुंडे:-

सत्तेत ल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले णि गृहखाते देखिल त्यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी भटके विमुक्त जाती जमातीच्या अनेक प्रश्नांना व समस्यांना न्याय देण्याचे व त्या समस्या मार्गी लावण्याचे कार्य सुरु केले होते.अतिशय दुर्लक्षित अशा पारधी समाजात त्यांनी जगण्याची उमेद निर्माण केली.पणही मोठ होऊ शकतो,सन्मानाने जगू शकतो हा विश्वास पारधी समाजात त्यांनी निर्माण केला.जो पारधी समाज परमेश्वराची पुजा खेटरांनी करित असे त्या पारधी समाजासाठी ते देव बनले यातचे सर्वकाही ले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काटोल-हिंगण्याकडे पारधी वस्तीवर ते गेले.तेथिल अवस्था,त्यांचे होणारे शोषण त्यांच्या लक्षात ले.त्याच ठिकाणी त्यांनी पारधी वस्त्यांना गावाचा दर्जा देऊन प्रत्येक वस्तित रस्ता,वीज,पाणी देऊ शाळा उभारु णि भटक्या विमुक्तांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमन्याची त्यांनी घोषणा केली.भटक्या विमुक्तांच्या विविध समस्या कार्यासाठी सतत क्रियाशिल असणारे श्री. रमेशजी पतंगे,डाॅ.भीमराव गस्ती,दादा इदाते,गिरिष प्रभुणे यांच्या ते सतत संपर्कात राहायचे.या मंडळीच्या पुढाकाराने गोपीनाथजी मुंडे यांच्या सहकार्याने पारधी प्रथमवसन,यमगरवाडी प्रकल्प काराला ले.

इदाते समिती(१९९७-१९९९) व शिफारसीची अमलबजावणीसाठी पुढाकार :-

स्वातंत्र्यानंतरसुध्दा भटके विमुक्तांच्या नशिबी भिकाऱ्यांचे व गुन्हेगारीचे जीवण वाट्याला ले  हे णि ते कुठेतरी थांबले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन या समाजासाठी अनेक लढे ऊभारण्याचे कार्य रा.स्व.संघ प्रणित भटके विमुक्त विकास परिषद हि संस्था कार्य करित होती.या संस्थेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी  सहकाऱ्यासहित दि.३ जुलै १९९५ रोजी गोपीनाथजी मुंडे यांची भेट घेतली णि मागण्यांचे निवेदन दिले.सदर निवेदनावंर त्यांनी तात्काळ कार्यवाही चालू केली णि त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे दि.११ मार्च १९९७ रोजी अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व श्री.भि.रा.उर्फ दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली  भटके विमुक्त जाती जमातीच्या अभ्यासाठी समितीची स्थापना करण्यात ली.हि समिती राज्याच्या कानाकोपऱ्यातील भटके विमुक्तांच्या पालावर,वस्त्यावर णि तांड्यावर प्रत्यक्ष गेली णि अभ्यास व संशोधन केले णि अतिशय महत्वपूर्ण अशा सुचना जानेवारी १९९९ मध्ये पल्या अहवालात शासनाला सादर केल्या. समितीचा अहवाल मिळताच त्याची तात्काळ अमलबजावणी गोपीनाथजी मुंडे यांनी चालू केली.त्यात प्रामुख्याने स्वतंत्र मंत्रालय,स्वतंत्र संचलनालय,वस्ती णि तांडे याना गावाचा दर्जा देणे,शिक्षण त्यादी विषय हाती घेतले होते.

स्वतंत्र मंत्रालय व संचलनालय:-

— देशात पहिल्यांदाच भटके विमुक्त जाती जमाती विकास मंत्रालय स्थापन करण्यात ले.स्वतंत्र कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री नेमण्यात ला.कॅबिनेट मंत्री म्हणून श्री.ण्णा डांगे तर राज्यमंत्री म्हणून श्री.भाई गिरकर यांची नेमणूक करण्यात ली.खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांना एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
— याच बरोबर स्वतंत्र ४९ जनांचे भटके विमुक्त संचलनालय स्थापन करण्यात ले.यामाध्यमातुन ज भटके विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाथी एक हजार श्रमशाळा चालू हेत.जातीचे दाखले,विविध समस्या,सामाजिक,शैक्षणिक विकास,मुलभुत सोई सुविधा या खात्याच्यामाध्यमातुन सुरु झाल्या.
— याच समितीच्या शिफारसीच्या धारे भटके विमुक्तांच्या धार्मिक स्थळांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देणे,यात्रा भरविणे,वस्ती व तांड्याना गावाचा/महसुली दर्जा देण्याचे कार्य गोपीनाथजी मुंडे यांनी केले.बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला णि करोडो रुपयांचा निधी जाहिर केला.त्यांच्या पुढाकाराने ताड्यांचा कायापालट होण्याची सुरुवात झाली होती.बंजारा समाजाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला हे.
— पोलिस स्टेशनमध्ये विमुक्तांची(गुन्हेगार जमातींची)यादी असे ती यादी रद्द करण्याची कार्यवाही गोपीनाथजी मुंडे यांनी केले व त्यांना सन्मान मिळवुन दिला.
—उसतोड कामगार हा मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त जाती जमातीमधील असल्यामुळे त्यांनी प्राधान्याने या वर्गाकडे लक्ष दिले.ऊसतोड कामगारासाठी कायमस्वरुपी कल्याण मंडळ असावे यासाठी प्रयत्नशील होते.त्या उसतोड कामगारांच्या लेकरांच्या शिक्षणाची परवड होऊ नये साठी वस्ती शाळा,पालावरची शाळा,साखर शाळा इ.प्रकल्पाना भरभरुन सहाय्य केले. 
— वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.                                           — इदाते समितीची अतिशय महत्वपुर्ण शिफारस होती कि, केंद्र सरकारने या समाजाची जनगणना करावी, केंद्रिय पातळीवर योग नेमावा णि स्वतंत्र शेड्युल तयार करावे यासाठी त्यांनी केंर सरकारकडे पाठपुरावा चालू केला होता दुर्देवाने राज्यातील सरकार गेले.पले स्वतंत्र मंत्रालय बंद केले गेले णि विकासाचे उघडलेले दरवाजे पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बंद केले.

राष्ट्रीय स्तरावर भटके विमुक्त णि ओबीसीसाठी योगदान:-

केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे त्यांनी भटके विमुक्तांचे केंद्र सरकारच्या अखत्यारित्या असलेल्या प्रश्नासाठी लढा व पाठपुरावा चालुच ठेवला होता.त्याच दरम्यान दादा इदाते यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी णि उपपंतप्रधान लालकृष्ण डवाणी यांच्याकडे केंद्रिय योग स्थापन करण्यासाठी निवेदन दिले होते.गोपीनाथजी मुंडे यांनी वारंवार या नेत्यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा चालुच ठेवला होता.याचाच परिणाम म्हणजे
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना भटके विमुक्तांना प्रवाहात णण्यासाठी त्यांच्या समस्यांच्या अभ्यासाठी राष्ट्रीय योगाची घोषणा केली.

राष्ट्रीय विमुक्त घूमंतू अर्धघुमंतू जनजाती योग:-

—श्री.नाईक योग(२२ नोव्हेंबर,२००३):-
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालयाअंतर्गत भटके विमुक्त जाती जमातीच्या अभ्यासाठी राष्ट्रीय विमुक्त घुमंतू अर्ध घुमंतू जनजाती योगाची स्थापना दि.२२ नोव्हेंबर २००३ रोजी करण्यात ली.अध्यक्षपदाची जबाबदारी श्री.नाईक यांच्याकडे देण्यात ली परंतू काही कारणास्तव योगाचे कार्यच सुरु झाले नाही.त्यातच त्यांनी राजीनामा दिला णि योगाचे काम काही काळासाठी स्थगित झाले होते.

—भटके विमुक्त महामेळावा,पंढरपूर:-
योगाचे कामकाज लवकर चालू व्हावे,अटलजींनी योगाची स्थापना केल्यामुळे णि भटक्या विमुक्तांच्या समास्या त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी दि.२२ जानेवारी २००४ रोजी पंढरपूर,जि.सोलापूर येथे भटके विमुक्तांचा महामेळावा णि अटलजींच्या सत्काराचे नियोजन केले होते.जवरच्या इतिहासातील हा ऐतिहासिक असा मेळावा झाला होता जो पुन्हा कधीही झाला नाही.या मेळाव्यात गोपीनाथजी मुंडे यांनी या समाजाच्या समस्या अटलजीसमोर मांडल्या णि यात लक्ष घालण्याची विनंती केली.तसेच योगाचे तात्काळ पुर्नंघठन करण्याची विनंती केली.अटलजींनी पनं तात्काळ योगाची रचना करुण या वंचित,उपेक्षित समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची घोषणा केली.पनं पुढील काही काळातचं केंद्रातील भाजपाचे सरकार गेले णि काँग्रेसचे सरकार सत्तेत ले.

श्री.बाळकृषाण रेणके योग (२००५-२००८) शिफारसी साठी लढा:-

गोपीनाथजी मुंडे यांनी विविध संस्था णि संघटनांच्या माध्यमातुन सत्तेवर लेल्या सरकारकडे राष्ट्रीय योग गठित करण्यासाठी पाठपुरावा व दबाव वाढविला होता तसेच काही संस्था व संघटना न्यायालयात पनं गेल्या होत्या.त्याचा परिणाम म्हणून डाॅ.मनमोहन सिंग यांच्या सरकारने दि.१६ मार्च,२००५ रोजी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली योगाची स्थापना केली.योगाचे प्रत्यक्षात कामकाज ६ फेब्रुवारी २००६ पासून सुरु झाले.३० जून २००८ रोजी योगाचा अहवाल सरकारकडे सादर झाला.परंतू सरकारने वेळकाडुपणाचे धोरण स्विकारत योगाच्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी एक समिती डाॅ. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्या समितीच्या सुचनेप्रमाणे रेणके योगाच्या शिफारसी  न स्विकारता त्या णखी ऐका नविन योगाची गरज असल्याचे नमुद केले.गोपीनाथजी मुंडे यांनी रेणके योग लागू करण्यासाठी सरकारकडे निवदने दिली.स्वत: पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांची भेट घेतली.त्यांनी दोलनाचा देखिल पवित्रा घेतला होता.सरकार,विचारसरणी यांचा कसलाही विचार न करता,कुणाला श्रेय मिळेल याचाही विचार न करता भटक्या विमुक्तांसाठी सर्वस्व पनाला लावनारा हा लोकनेता होता.

ओबीसी जनगणना करण्याची मागणी:-

इ.स.२००९ मध्ये  लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुक लढवली णि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले णि राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला.पहिल्याच टप्यात त्यांची लोकसभेच्या उपनेते पदी णि लोकलेखा समितिच्या अध्यक्ष पदी निवड झाली हे त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा होता.दिल्लीच्या राजकरणात गेल्यावर सहसा बरिच नेते जुळवुन घेन्याच्या नादात मवाळ होतात पनं गोपीनाथजी मुंडे मधला सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत असेलेला ओबीसी जागा झाला.केंद्रिय पातळीवर सर्व भटके विमुक्त जे विविध राज्यात विविध प्रवर्गात हेत ते एकत्रित ओबीसी या प्रवर्गात येतात णि जे महाराष्ट्र सोडता प्रचंड  मागासलेले आहेत फ्याना कोणतेही राजकीय नेतृत्व नाही तरयाची जाणीव त्यांना होती.दि.६ मे २०१० रोजी गोपीनाथजी मुंडे नियम १९३ अन्वये लोकसभेत ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केली.१९३१ नंतर ओबीसींची जनगणना झालेली नाही.या देशात पशुंची,जनावराची,पक्षाची जनगणना होते तर ओबीसींची का नाही असा प्रश्न उपस्थित केला एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला.संपूर्ण देशात एका प्रस्तापित राजकिय व्यवस्थेत भूकंप ला होता.ओबीसी मधिल अनेक जाती जमाती दलितांपेक्षाही वाईट णि हिन जीवण जगतात याची जाणिव त्यांनी सरकारला करुन दिली. ज ओबीसी प्रवर्गाला मिळालेला घटनात्मक दर्जा,कायम स्वरुपी राष्ट्रीय ओबीसी योग याचे मुळ गोपीनाथजी मुंडे यांचे योगदान हे. 

राष्ट्रीय इदाते योग(९ जानेवारी २०१५ - ८ जानेवारी,२०१८):-

कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू  जनजाती योगाची स्थापणा केली.खरं तर हा  राष्ट्रीय योगच मुळ महाराष्ट्रातील इदाते समितीच्या(१९९९) शिफारसीवर धारित हे णि दादा इदाते यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे गोपीनाथजी मुंडे यांना अपेक्षित कार्य त्यांच्या मृत्युपश्चात दादा इदाते पुढे चालुच ठेवले. तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय अभ्यासपुर्वक अशा शिफारसी सहित पला अहवाल ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारला सादर केला णि हा योग लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांना समर्पित करित असल्याची भावना व्यक्त केली हे. केंद्र सरकार सकारात्मक प्रतिसाद देत हे.
-केंद्रिय विमुक्त घुमंतू जनजाती कल्याण मंडळाची २०१९ च्या अर्थसंकल्पात घोषणा  करण्यात ली णि कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यानंर पहिल्या विकास व कल्याण मंडळाची स्थापना सुध्दा करण्यात ली हे. 

समारोप:-

एकंदरित पण लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे योगदान किती अविस्मरणिय होते.त्यांची दुरदृष्ठी किती श्रेष्ठ होती णि या समाजाच्या विकासाचा पाया कित्ती भक्कम त्यांनी रचुन ठेवला हे याची जाणीव होत हे.ओबीसी जनगणना,राष्ट्रीय विमुक्त जनजाती योग,ओबीसी घटनात्मक दर्जा,ओबीसी योग,केंद्रिय विमुक्त घुमंतू कल्याण मंडळ,ऊसतोड कामगार कल्याण मंडळ ई. निर्माण होत असलेल्या व्यवस्थेचे मुळ गोपीनाथजी मुंडे यांचे या चळवळीतील निस्वार्थ भावनेने दिलेले योगदान आहे  याचा विसर पल्याला पडता कामा नये.खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या,सामाजिक,शैक्षणिक,राजकिय प्रवाहात णण्याचे प्रक्रिचे गोपीनाथजी हे द्य प्रवर्तक व प्रणेते हेत.
गोपीनाथजी मुंडे यांनी भटक्या विमुक्तांच्या पालापालात निर्भयता णली.भयग्रस्त,खचलेले,अचेत भटके विमुक्त त्यांच्या मुळेच ज ताठ मानेने जगत हेत.
नंदिवाले,मेंढगी,जोशी,मरिईवाले,घिसाडी,मदारी,टकारी,पारधी जही भटके जीवण जगत हेत.त्यांचा पालावर,वस्तीवर जाणारा नेता ज कुठेही दिसत नाही.भटके विमुक्तांचे दु:ख जाणणारा,त्यांच्या जीवणाशी एकरुप,समरस झालेला,त्यांच्या मांडीला मांडी लावून बसुन गप्पा मारणारा,त्यांच्यासोबत जेवणारा,त्यांच्या व्यथा समजून घेणारा हा एकमेव लोकनेता होता.भटके विमुक्तांना ते पले नेते वाटायचे यातच त्यांचे लोकनेतेपनं लं.
ऐका अर्थपुर्ण वाक्यात गोपीनाथजी मुंडे साहेबांचे या समजाच्या विकासाठी योगदान सांगायचे झाले तरं "भटक्यांची पालं ठोकताना मेढ रोवतात.त्या मेढीवरचं पालाची सारी भिस्त असते.ती मेढ म्हणजेच गोपीनाथजी मुंडे साहेब होते".जही त्यांचे योगदान त्या मेढीच्या रुपाने निरतंर कार्यरत राहिल याची मनाला जाणीव होते.

संदर्भ- 

1)विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास व संशोधन(इदाते समिती)अहवाल,समाज कल्याण विभाग,महाराष्ट्र शासन,जानेवारी १९९९.
2)राष्ट्रीय विमुक्त जनजाती योग(इदाते योग) अहवाल(२०१८),समाजिक न्याय विभाग,भारत सरकार
3)लोकनेता स्मृती विषेशांक,भाजपा मुंबई
४)लोकनेते गोपीनाथ मुंडे णि त्यांचे कार्य,डाॅ.बाबासाहेब शेप.
५)उपेक्षितांचा तारणहार,डाॅ.परमेश्वर मुंडे.
६)भटक्याचे भावविश्व त्रैमासिक औरंगाबाद, ओ.पी.गिर्‍हे.
७)विमुक्त(गुन्हेगार)जमाती णि साज्यघटनेतील अधिकार,डाॅ.लक्ष्मण जाधव.
८)मुलाखत- कर्मवीर भि.रा.(दादा)इदाते
मा.अध्यक्ष राष्ट्रीय विमुक्त जनजाती योग,भारत सरकार.श्री.अनिल देविदास फड 
(M.sc(Microbiology),M.A.(Marathi),B.G.L.(Law),Dip.In Trade Unionism & Industrial Relations)
राष्ट्रीय कार्यवाह-अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद(अखिल भारतीय)
प्रदेशाध्यक्ष-वंजारी सेवा संघ(असो.)महाराष्ट्र राज्य
संपर्क क्र.-८१०८९२५७७७,८१६९२२१५८९
ई-मेल:-anilphad5@gmail.com
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment