श्रीलंकेचे नवे पंतप्रधान महिंदा राजपक्षे



- धाकट्या भावाकडून घेतली पदाची शपथ

- महिंदा राजपक्षे यांनी गुरुवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

- लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दोनच दिवसांत ही घडामोड झाल्यानंतर आता एकाच परिवाराकडे सत्ता एकवटली आहे. 

- देशात ऑगस्ट २०२०मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, तोपर्यंत महिंदा काळजीवाहू सरकार चालवतील.

- महिंदा यांना अध्यक्षीय कार्यालयात त्यांच्याच भावाने शपथ दिली. 

- तत्पूर्वी विक्रमसिंघे यांनी त्यांचा राजीनामा अध्यक्षांकडे सोपविला. 

 - शपथविधी सोहळ्यास माजी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे, माजी अध्यक्ष मैत्रिपला सिरिसेना आणि इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते. 

- महिंदा यांची ही दुसरी वेळ आहे. 

- यापूर्वी देशात राजकीय अस्थिरता होती तेव्हा, 
       ~ २०१८मध्ये ते काही काळ पंतप्रधान होते. त्यांनी
       ~ २००५ ते २०१५ या काळात अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 
       ~ वयाच्या २४व्या वर्षी ते प्रथम संसद सदस्य झाले होते. 

- लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात 'एलटीटीई'ला संपविण्यात राजपक्षे बंधूंची भूमिका होती.

- दरम्यान, नव्या पंतप्रधानांसाठी मावळते पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी त्वरित निवासस्थान मोकळे केले आहे. 

 -अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीच्या (यूएनपी) उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजीनामा दिला होता.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment