120 वर्षांपूर्वीच्या लाईट हाऊसला अन्यत्र हलवले

डेन्मार्कमध्ये 120 वर्षांपूर्वी समुद्रकिनारी दीपगृह म्हणजेच लाईट हाऊसची उभारणी करण्यात आली होती. 

1990 मध्ये त्याच्यापासून समुद्राचे अंतर 660 फूट होते. आता ते केवळ 20 फूटच राहिलेले आहे. जर ते हलवले नाही तर एक दिवस ते समुद्रार्पण होईल, अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे लाईट हाऊस तेथून हलवण्यात आले आहे.

या लाईट हाऊसला 'रूबजर्ग नूड' असे म्हटले जाते. आता त्याला समुद्रापासून 260 फूट अंतरावर स्थापित करण्यात आले आहे. 

त्यानंतर ते पुन्हा एकदा प्रकाशित करण्यात आले असून निळ्या, चमकदार प्रकाशात ते उजळून निघते. 

नव्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले असून अनेक लोक ते पाहण्यासाठी येत आहेत.

हे लाईट हाऊस चाकांच्या सहाय्याने हलवले जात असतानाही ते द‍ृश्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. 

या लाईट हाऊसचे वजन सुमारे एक हजार टन आहे. ते हलवण्यासाठी 5 दशलक्ष क्रोनर खर्च करण्यात आले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment