राज्यसभेसाठी भाजपाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
आणि उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल
केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘करोना गो करोना गो असं
म्हणताना महाविकास आघाडी गो… असं आम्हाला म्हणावं लाणार आहे,’ असं मत
आठवलेंनी नोंदवलं.
आठवले यांनी विधानभवनामध्ये येऊन अर्ज दाखल केला. त्यानंतर
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना करोना विषाणूचा देशात होत असणाऱ्या
फैलावासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी गो करोना
गो या आपल्या व्हायर व्हिडिओमुळे देशात आणि राज्यात करोनाचे कमी रुग्ण
अढळून आल्याचा दावा केला. “मी गो करोना असं म्हटलं आहे. त्यामुळे तो
महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरलेला नाही. तरीही सरकारकडून
यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही करोनाला जायला सांगितलं आहे. पण तो
होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी
आहे. आपल्या गावामध्ये, आपल्यामध्ये करोना येता कामा नये यासाठी आपणही
काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी मांडलं.
राजकीय टोला
निघता निघता आठवलेंनी महाविकास आघाडीलाही टोला लगावला. “जोपर्यंत करोना
देशातून जात नाही तोपर्यंत आम्ही गो करोना गो म्हणत राहणार आहोत. तसेच
करोना गो करोना गो असं म्हणताना गो महाविकास आघाडी गो… असं आम्हाला म्हणावं
लाणार आहे,” असं आठवले म्हणाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment