करोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य-WHO

करोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य-WHO
करोनानं अवघं जग वेठीस धरलं आहे. चीनमध्ये उद्रेक झालेल्या या विषाणूनं सगळ्या जगालाच कवेत घेतलं आहे. महासत्ता असलेली राष्ट्रांचीही अवस्था करोनानं केविलवाणी करून ठेवली असून, भारतातही काही ठिकाणी काळजी करण्यासारखी स्थिती आहे. एकीकडे जग करोनाचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. तर दुसरीकडं करोनावरील औषधासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. या मुलाखतीत बोलताना नाबारो यांनी भारतानं करोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. “भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं करोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे,” असं नाबारो म्हणाले.
“भारतानं ज्या पद्धतीनं करोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग ११ दिवसांचा आहे. हा कालावधी म्हणजे प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी चांगली संधी आहे,” असं मत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केलं.


करोनावरील लशीसंदर्भात बोलताना नाबारो म्हणाले,”मला हे सांगायचं की, हा विषाणू न रोखता जगभरात पसरू दिला, तर अनेक लोकांना संसर्ग होईल. त्याचबरोबर असंख्य लोक मरण पावतील. करोनाविषयी सगळ्या गोष्टी अजून आपल्याला समजू शकलेल्या नाहीत. हा आजार श्वसन विकाराबरोबरच शरीरावर परिणाम करू शकतो. करोनावरील लस पुढील दोन वर्षे तरी माणसाच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे मी प्रत्येकालाच दोन वर्ष तरी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेत जगणं शिकायला हवं. पृथ्वीवरील ७.८ मिलियन लोकांनी तशी सवय लावून घ्यायला हवी,” नाबारो म्हणाले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment