![]() |
नमस्तेमुळे सोशल डिस्टंन्सिंगचं पालन |
सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाग्रस्तांची संख्या कमी आहे. भारतात एकमेकांना भेटल्यानंतर हात मिळवण्याऐवजी नमस्ते करण्याची प्रथा आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगही पाळलं जातं. करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं मानलं जातं. अशाच काही सांस्कृतिक बाबींमुळे भारतात करोनाग्रस्तांची संख्या कमी असू शकते असं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
करोनानं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. न्यूयॉर्क, पॅरिस आणि लंडन अशा मोठ्या शहरांमध्येही करोनाग्रस्तांची संख्या मोठी आहे. परंतु नवी दिल्ली, बगदाद, बँकॉक अशा ठिकाणी मात्र ही संख्या नियंत्रणात असल्याचं ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या ‘द कोविड-१९ रिडल : व्हाय डज द व्हायरस वॅलॉप सम प्लेसेज अँड स्पेअर अदर्स?’ या अहवालात म्हटलं आहे.
संस्कृतीमुळे बचाव
आपल्या संस्कृतीमुळे अनेक देश आज सुरक्षित आहेत. काही ठिकाणी पूर्वीपासूनच सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं. भारत आणि थायलँडमध्ये इतर देशांच्या तुलनेनं करोनाग्रस्तांची संख्या कमी आहे. एकमेकांना हात जोडून अभिवादन करण्याची प्रथा या देशांमध्ये आहे. तर दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये शीर झुकवून एकमेकांना अभिवादन करण्याची प्रथा आहे. तसंच या ठिकाणी थोडा जरी आजार असल्याचं जाणावल तर लोकं मास्कचा वापर करतात, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
ज्येष्ठांची घरातच काळजी
विकसनशील देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची घरातच सेवा करण्याची संस्कृती आहे. त्यामुळे या ठिकाणी पश्चिमेकडील देशांच्या तुसनेत वरिष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे, असं अहवालात नमूद केलं आहे. तर काही देशांमध्ये युवकांची संख्या अधिक असल्यानं त्या ठिकाणी करोनाचा प्रसार कमी प्रमाणात झाल्याचं मत ‘हार्वर्ड ग्लोबल हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूट’चे संचालक आशिष झा यांनी सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment