![]() |
अमेरिकेत भारतीय डॉक्टर, नर्सेसना मिळू शकते ‘ग्रीन कार्ड’ |
करोना व्हायरसमुळे अमेरिकेत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. तिथे ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर मोठया प्रमाणावर ताण आहे. वैद्यकीय क्षेत्राची ही गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातील हजारो डॉक्टर, नर्सेस यांना कायमस्वरुपी कायदेशी नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड द्यावे असा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडण्यात आला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
सभागृहाच्या सदस्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये यासंबंधी विधेयक मांडले आहे. ‘हेल्थकेअर वर्कफोर्स सेसिलियन्स अॅक्ट’ या कायद्यातंर्गत वैद्यकीय क्षेत्रातील हजारो तज्ज्ञांना कायमस्वरुपी अमेरिकेत सेवा करण्याची संधी मिळू शकते. COVID-19 च्या या संकटकाळात हे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या २५ हजार नर्सेस आणि १५ हजार डॉक्टरांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकते.
लोवा सारख्या काही भागांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची गरज आहे. यामुळे ती कमरता भरुन निघेल असे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. H-1B किंवा J2 व्हिसावर अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय नर्सेस आणि डॉक्टरांना याचा फायदा होऊ शकतो. H-1B व्हिसा अंतर्गत अमेरिक कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरीवर ठेवण्याची परवानगी मिळते. भारत, चीनमधून हजारो भारतीय दरवर्षी H-1B व्हिसावर काम करतात.
0 comments:
Post a Comment
Please add comment