२०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी महाराष्ट्रातील शाळांची फी वाढ करण्यात येणार नाही असं महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने म्हटलं आहे.तसंच पालकांना शाळेची फी भरण्यासाठी महिन्याचा किंवा तीन महिन्यांचा पर्याय देण्यात यावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच २०१९-२० या वर्षाची काही फी राहिली असेल तर ती भरण्यासाठी सक्ती करु नये असंही महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
राज्य सरकारने लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे. शाळांनी एकदम वार्षिक फी भरावी अशी सक्ती कोणत्याही शाळेनं करु नये असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment