वटवाघुळांमध्येही असतो करोना व्हायरस – ICMR

वटवाघुळांमध्येही असतो करोना व्हायरस – ICMR
वटवाघुळांमध्येही करोना व्हायरस असतो अशी माहिती ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रामन  गंगाखेडकर यांनी दिली. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार करोना व्हायरस हा वटवाघुळांमध्येही असतो. हा व्हायरस वटवाघुळांमधून संक्रमित झाला असं म्हटलं जातं त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे संशोधन केले. आम्हाला असं आढळून आलं की दोन प्रकारच्या वटवाघुळांमध्ये करोना व्हायरस असतो. मात्र त्याचं संक्रमण माणसाकडे होत नाही. तो वटवाघुळांमध्येच संक्रमित होऊ शकतो. वटवाघुळांमधून माणसाकडे करोना संक्रमित होणं ही घटना हजार वर्षात एखादी घडू शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ICMR चे रामन  गंगाखेडकर यांना वटवाघुळांमुळे करोना पसरतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना हा व्हायरस दोन प्रकारांच्या वटवाघुळांमध्ये आढळतो. मात्र तो वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वटवाघुळातून माणसात करोना संक्रमित होण्याची शक्यता १ हजार वर्षात एखादी घडते असंही त्यांनी म्हटलं आहे.
चीनमध्ये करोनाचा संसर्ग वटवाघुळाद्वारे होतो का? यावर संशोधन करण्यात आले होते. त्यांनी असा निष्कर्ष काढला की कदाचित असं घडू शकतं. ज्यानंतर भारतातही असं संशोधन करण्यात आलं. तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की दोन प्रकारच्या वटवाघुळांमध्ये करोना व्हायरस असतो. मात्र त्याचा संसर्ग माणसाला होणं हे जवळपास अशक्य आहे अशी घटना हजार वर्षांतून एकदा घडते.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king