coronavirus | मालेगावमध्ये कोरोना चे पेशन्ट कसे वाढले? |
जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी देशात लॉकडाऊन लागू केला आहे, मात्र जसे दिवस वाढतायत तशीच कोरोनाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात आतापर्यंत 7447 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 643 रुग्ण बरेदेखील झालेत, 239 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1800पर्यंत गेली आहे, राज्यात आतापर्यंत 110 रुग्णांचे कोरोनामुळे जीव गेले आहेत.
तीन दिवसात नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण पॉझिटिव आले आहेत. याशिवाय एकाचा मृत्यु झाला आहे. प्रशासनाकडून मालेगावसाठी इमर्जन्सी सेंटरची उभारणी. मालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. मालेगाव शहरात कोरोनाचे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 35 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांसह 27 नर्सचादेखील समावेश आहे अशी माहिती सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ.हितेश महाले यांनी दिली आहे.
मालेगावमध्ये कोरोना चे पेशन्ट कसे वाढले जाणून घ्या.
0 comments:
Post a Comment
Please add comment