करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था संकटात - फिच

करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था संकटात - फिच
करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.
जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. त्याच काळात जागतिक बँकेने भारताचा विकासदर १.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
२०१९-२० मध्ये ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते. ते घसरुन २०२०-२१ मध्ये ०.३ टक्के होईल असा फिचचा अंदाज आहे. भारतच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या जगातील सगळयाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांना करोना व्हायरसचा मोठा आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment