![]() |
सेमीफायनलमध्ये पावसाचे विघ्न! सामना रद्द झाल्यास .. |
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आयसीसी टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये (Womens T20 World Cup) सेमीफायनल सामना होत आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे संकट आहे. सिडनीमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळं टॉसही लांबला आहे. मात्र पाऊस थांबला नाही तर एकही चेंडू न खेळता एका संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळेल.
आयसीसीच्या वतीने वर्ल्ड कपमध्ये रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळं सामना रद्द झाल्यास गुणतालिकेनुसार एक संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. या नियमानुसार भारतीय संघाने गटसाखळीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं सामना रद्द झाल्यास भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर दुसरीकडे आजच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा दुसरा सेमीफायनल सामना होत आहे. त्यामुळं या नियमानुसार भारत-दक्षिण आफ्रिका हे संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतील
0 comments:
Post a Comment
Please add comment