![]() |
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सई ताम्हणकरचा पाय फ्रॅक्चर |
सई ‘मिमी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मला आई व्हायचंय’या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाचं शुटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरचा 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला सईच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी आहे. सईच्या पायाला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. सई सध्या बॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगसाठी राजस्थानमध्ये आहे. चित्रपटाचं शूटिंग संपवून सई हॉटेलवर येताना तिच्या पायाला दुखापत झाली.
सई ‘मिमी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मला आई व्हायचंय’या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाचं शूटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे.
चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सई हॉटेवर निघाली होती. त्याच दरम्यान तिचा पाय मुरगळला आणि तिच्या पायाला दुखापत झाली. सध्या सईच्या पायाला फ्रॅक्चर असून अशा अवस्थेत शो मस्ट गो ऑन म्हणत तिनं चित्रपटाचं शूटिंग सुरू ठेवलं. सेटवर तिची योग्य सईची काळजी घेतली जात आहे. आणखी काही दिवस सईला अशाच अवस्थेत शूटिंग करावं लागणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment