![]() |
भारत पुन्हा पराभूत; न्यूझीलंडचा विजय |
गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेली आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं भारतावर दुसऱ्या कसोटीत सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून भारताला व्हाइटवॉश दिला.
भारतानं पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला २३५ धावांवर गुंडाळलं होतं. भारत या कसोटीत वापसी करून कसोटी मालिका बरोबरीत सोडवणार असं वाटलं होतं. मात्र, गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं असं चित्र दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावांचं लक्ष्य सहज गाठलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment