नायडू रुग्णालयात आणखी १० संशयित रुग्ण

नायडू रुग्णालयात आणखी १० संशयित रुग्ण

नायडू रुग्णालयात मध्यरात्री अमेरिका, कोरिया, इटली, जर्मनी, स्वीडन, सिंगापूर या देशातून परदेश दौरा करून आलेल्या रुग्णांना लक्षणे दिसून आली. त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे हे प्रवासी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत ९० जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ८० जणांना घरी सोडण्यात आले. १८१ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १२५ जणांची तपासणी बाकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
पुण्यातून काम अथवा नोकरी निमित्ताने परदेश दौऱ्यावर गेलेल्या दहा जणांना करोनासदृश लक्षणांमुळे नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ९० पर्यंत पोहोचली आहे. दहा जणांच्या चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. लोणावळा, सोलापूर येथे करोनाचे संशयित रुग्ण असल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, त्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


पुणे जिल्ह्यातील लोणावळा तसेच सोलापूर जिल्ह्यात 'करोना'चे रुग्ण आढळल्याची अफवा दिवसभर वाऱ्यासारखी पसरली. त्याबाबत आरोग्य खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. सोलापूर तसेच लोणावळा येथे करोनाचे कोणत्याही प्रकारचे रुग्ण आढळले नाही. त्या अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५८६ विमानांमधील ६९,५०२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोनाबाधित देशातील प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू होणार आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १८७ जणांना भरती करण्यात आले आहे. भरती झालेल्या १८७ प्रवाशांपैकी १७० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king