CoronavirusOutbreak | आनंद महिंद्रा नंतर आता उद्द्योगपति अनिल अग्रवाल यांचा भारताला मदतीचा हात

CoronavirusOutbreak
CoronavirusOutbreak | आनंद महिंद्रा नंतर आता उद्द्योगपति अनिल अग्रवाल यांचा भारताला  मदतीचा हात 
देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अशाच उद्योग जगतामधील व्यक्ती या आजाराशी दोन हात करण्याच्या उद्देशाने मदत घोषित करतील अशी अपेक्षा अनेकांना होती. सोशल नेटवर्किंगवर अशापद्धतीचे काही मेसेजेसही व्हायरल झाले होते. मात्र आता खरोखरच भारतीय उद्योग श्रेत्रातील बड्या कंपन्यांनी आणि व्यक्तींना करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मदतीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदतीचे घोषणा केली. त्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी मदतीचे घोषणा केली आहे. 
अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी १०० कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी ५ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रांनी केली सुरुवात
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे करोना संकटावर मात करण्यासाठी पुढे आलेले पहिले उद्योगपती ठरले आङेत. रविवारी त्यांनी ट्विटवरुन केलेल्या घोषणेमध्ये आपला संपूर्ण पगार करोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या निधीला देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही असं करण्यास सांगितलं आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखीन काही घोषणा करणार असल्याचेही महिंद्रा यांनी स्पष्ट केलं आहे. 
अनिल अग्रवाल काय म्हणाले
अनिल अग्रवाल यांनी ट्विटवरुन करोनासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली. “मी या महामारीविरोधात लढण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी खास चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत,” असं अग्रवाल यांनी ट्विटवमध्ये म्हटलं आहे.About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

1 comments:

Please add comment