Coronavirus | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार

Coronavirus | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान कार्यालय पीएमओने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.'
आणखी एक ट्वीट करत पीएमओने सांगितलं आहे की, 'पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत समिक्षा करण्यासाठी एका उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. तेसचे ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, 'कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला आणखी मजबुत करण्याच्या पद्धतींवर चर्चा करणार.'About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

1 comments:

  1. Vampires in the Enchanted Castle casino - FilmFileEurope
    Vampires in the Enchanted Castle Casino. Vampires in the Enchanted worrione.com Castle Casino. goyangfc Vampires in the Enchanted Castle Casino. Vampires in https://vannienailor4166blog.blogspot.com/ the Enchanted Castle Casino. Vampires ventureberg.com/ in the Enchanted filmfileeurope.com

    ReplyDelete

Please add comment