![]() |
Coronavirus | कलाकार, राजकीय नेते, कर्मचारी मदतीसाठी सरसावले |
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये सिनेकलाकार, खेळाडू, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे.
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला असून 45 उपचारांनी बरे झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.
प्रभासकडून 4 कोटींची मदत
'बाहुबली' अर्थात प्रभासने कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यासाठी चार कोटी रुपयांची मदत केली आहे. प्रभासने गुरुवारी (26 मार्च) 3 कोटी रुपये पंतप्रधान मदतनिधीमध्ये तर 50-50 लाख रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केले.

दरम्यान प्रभास नुकताच जॉर्जियाहून परतला आहे. आगामी 'प्रभास 20' या चित्रपटाचं शूटिंग तिथे सुरु होतं. तिथून परतल्यानंतर खबरदारी म्हणून प्रभासने स्वत:ला होम क्वॉरन्टाईन
तेलुगू अभिनेत्यांकडून मदतीचा हात
त्याआधी तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनीही दोन कोटी रुपये मदत निधीला दान केली होती. तसंच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रत्येकी 50 लाखांची मदत करणार असल्याचं त्याने सांगितलं.

याशिवाय पवन कल्याण यांचा पुतण्या रामचरणने 1 कोटी 40 लाख, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीने 1 कोटी आणि महेश बाबूने 1 कोटी रुपये दान केले आहेत.
हृतिक आणि कपिलही सरसावले
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्म हे देखील मदतीसाठी समोर आले आहेत. हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्मानेही पंतप्रधान मदत निधीमध्ये 50 लाख रुपयांची रक्कम दान केल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय करण जोहर, आयुष्मान खुराना, नितेश तिवारी, तापसी पन्नू, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
सौरव गांगुली 50 लाख रुपयांचे तांदूळ देणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण विशेषत: हातावर पोट असलेले मजूर अडचणींचा सामना करत आहे. या लोकांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली समोर आला आहे. सौरव गांगुली गोरगरिबांना मोफत तांदूळ वाटणार आहे. यासाठी तो 50 लाख रुपये खर्च करणार आहे.

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचं वेतन
महाराष्ट्रातील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या पुणे विभागातील 5300 पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मार्च 2020 मधील एका दिवसाचं वेतना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमवरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचा पगार दान करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचललं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषद आमदार तसंच खासदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment