corona treatment india :महामुंबईत १४ ‘करोना’रुग्ण |
१८ जानेवारीपासून आत्तापर्यंत २ लाख ४६ हजार ८४३ प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये करोना संशयित असलेल्या ४९८ रुग्णांची पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये ४५२ जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईसह राज्यभरात करोनाची भीती वाढत असतानाच शनिवारी कोरोनाची लागण झालेल्या कल्याणमधील एका रुग्णाची पत्नी (३७) आणि तिच्या तीन वर्षीय मुलीलाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तसेच भांडुपमधील एक आणि नवी मुंबईतील दोन रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान सोमवारी झाले. त्यामुळे महामुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईचे सहा तर मुंबईबाहेरच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईतील सहा आणि मुंबईबाहेरील आठ जण करोना 'पॉझिटिव्ह' आढळले आहेत. यामध्ये रविवारी तपासणी झालेल्या संशयितांचे हवाल सोमवारी आले असून भांडुपमधील एक, कल्याणचे दोन आणि नवी मुंबईतील दोन संशयितांच्या चाचण्या 'पॉझेटिव्ह' आल्या आहेत. नवी मुंबईतील दोन रुग्ण ४२ आणि ४७ वर्षीय असून हे रुग्ण १४ मार्च रोजी निदान झालेल्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आले होते. भांडुपचा रुग्ण पोर्तुगाल येथून १३ मार्च रोजी मुंबईत आला होता. सोमवारी सायंकाळी ६.३० पर्यंत आलेल्या करोना संशयितांच्या २० पैकी २० चाचण्या निगेटिव्ह' आल्या असून २४ जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
'कस्तुरबा'त ६५ जणांवर उपचार
कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आत्तापर्यंत १८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ४३३ संशयितांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर कस्तुरबात एकूण ६५ रुग्णांवर जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. शाह यांनी दिली.
corona treatment india
0 comments:
Post a Comment
Please add comment