Corona Outbreaks : शेअर बाजारात ९०० अंकांची घसरण

Corona Outbreaks : शेअर बाजारात  ९०० अंकांची घसरण

करोना विषाणूने (Corona Outbreaks) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. यामुळे महामंदी येणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद आज भांडवली बाजारांवर उमटले. आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५० अंकांनी कोसळला होता. यात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

करोना मृतांची संख्या ३३ हजारांच्यापुढे गेली आहे. या विषाणूने चीन, अमेरिका यांच्यासह बहुतांश विकसानशील अर्थव्यवस्थानांना जबर फटका दिला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज सकाळी जोरदार विक्री केली. सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २८ शेअर घसरले. ज्यात आयटीसी, अल्ट्राटेक, भारती एअरटेल, बजाज ऑटो, एसबीआय, मारुती , महिंद्रा, बजाज फायनान्स, टायटन, एचडीएफसी , एशियन पेंट या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

आज आशियातील इतर शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया या शेअर निर्देशांकात घसरण झाली. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ४ टक्के घसरण झाली आहे. सध्या सेन्सेक्स ५४१ अंकाच्या घसरणीसह २९२७३ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी १५० अंकांच्या घसरणीसह ८५०० अंकांवर आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment