नागपूरमधील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले करोनाचे चार संशयित रूग्णांनी पलायन केल्यानं एकच खळबळ उडाली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही करोना विषाणूनं पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी करोनाच्या संशयित रूग्णांना मयो रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, या रुग्णांनी पलायन केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मयो रूग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं होतं. परंतु शनिवारी या ठिकाणी करोनाचा रुग्ण असल्याची अफवा सकाळच्या सुमारास या वॉर्डमध्ये पसरली. त्यानंतर या वॉर्डमध्ये दाखल असेल्या चार संशयित रूग्णांनी पलायन केलं. यापैकी एक रूग्ण चंद्रपुरातील तर तीन रूग्ण नागपुरातील आहेत.
दरम्यान, काही वेळानं रूग्णालयाच्या प्रशासनाच्या ही बाब ध्यानात आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर रूग्णालयानं पोलिसांशी संपर्क साधून या घटनेबाबत माहिती दिली. तसंच रूग्णांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला. यावेली हे रूग्ण आपल्या घरी असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.
0 comments:
Post a Comment
Please add comment