बारामतीत कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना जमावाची मारहाण |
करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरांत आणि गावखेड्यातही प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. जनतेच्या हितासाठी पोलीस दिवसरात्र झटत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचा लज्जास्पद प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदार संघात घडला आहे. जमावाने एकत्र ऐवून पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात नऊ पोलीस जखमी झाले आहेत. जळोची परिसरातून १५ जणांना पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे.
शुक्रावारी दुपारी बारामतीमध्ये दोन ठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला. शहरातील जळोची भागात काही नागरिकांनी पोलिसांना मारहाण केली. यात काही कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे. तर काल सायंकाळच्या सुमारास काटेवाडीमध्येही क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.
बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस शशिकांत कवितके यांनी शुक्रवारी सांयकाळी मुलं क्रिकेट खेळत होते त्याठिकाणी जाऊन आपण जमाव करू नका. घरातच जाऊन बसा. क्रिकेट खेळू नका असे सांगितले. पण क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकाने या पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केली. तर जमावातील एकाने दगड मारला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बारामती शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment