सिलिंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग, स्कूल बसही जळून खाक

सिलिंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग, स्कूल बसही जळून खाक


सुरत,9 जानेवारी: ऑलपॅड कोस्टल हायवेवर सिलिंडरनी भरलेला ट्रक उलटून त्याला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, शेजारून जाणाऱ्या स्कूल बसही आगीच्या कचाट्यात सापडली. बसचालक आणि क्लीनरने प्रसंगावधान राखून सर्व विद्यार्थ्यांना तातडीने बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठी हानी टळली. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. परंतु स्कूल बस आणि एक ऑटो रिक्षा जळून खाक झाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांला ही घटना घडली. एलपीजी गॅस सिलिंडर्सनी भरलेला ट्रक ओलपाडजवळ रस्त्यावर उलटला. ट्रक उलटताच ट्रकमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे ट्रक शेजारून जाणारा खासगी शाळेची बस व रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्कूल बसचा चालक आणि क्लीनरने प्रसंगावधान राखून बसमधून विद्यार्थ्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढले. सध्या सुरत येथील अग्निशमन विभागाच्या पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. या आगीमुळे सुरत-ऑलपॅड कोस्टल हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात सुरत शहरात अशीच एक भीषण आगीची घटना घडली होती. सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागली होती. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले होते.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment