बगदाद विमानतळावर करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू

बगदादः बगदाद विमानतळावर करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱ्याने दिली आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. तसेच ८ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. इराकी टीव्हीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराण कमांडर कासिम सोलेमानाचाही मृत्यू झाला आहे.

बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. इराकमध्या दूतावासाची झालेली तोडफोडीनंतर काही सेकंदात अमेरिकेने त्या ठिकाणी लष्कर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. दूतावासावर हल्ला करण्यात आल्यानंतर अमेरिका पश्चिम आशियात ७५० अमेरिकन जवान पाठवणार आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिका ४००० सैनिकांना पाठवणार असून त्यातील ५०० जणांना पाठवले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी इराकमध्ये झालेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला संबोधले आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवला असून यात एकाची ओळख पटली आहे. अबू महदी अल मुहादिस असं त्याचं नाव असल्याचं अमेरिकेने म्हटले आहे.

मुहादिस तेहरान समर्थक इराकी सशस्त्र समुहातील शिया नेटवर्क हश्द अल शाबीचा दुसऱ्या नंबरचा प्रमुख आहे. कतैब हिजबुल्लाह सुद्धा याचाच एक भाग असून त्यानेच अमेरिकन विमानतळांना लक्ष्य केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना इराणवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment