नियमित करा ट्रॅक्‍टरची देखभाल

नियमित करा ट्रॅक्‍टरची देखभाल            

ट्रॅक्‍टर दीर्घकाळ चांगला चालण्यासाठी वेळोवेळी देखभाल व योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे.

ट्रॅक्‍टरने 10 तास काम केल्यानंतर किंवा दररोज घ्यावयाची काळजी :
1) इंजिन ऑईलची पातळी तपासावी डिपस्टिकच्या खुणेपर्यंत तेल भरणे.
2) एअर क्‍लिनरचे बाऊल स्वच्छ खुणेपर्यंत ऑईल भरावे.
3) रेडिएटरमध्ये पाणी आहे किंवा नाही याची खात्री करून स्वच्छ पाणी भरावे.
4) दररोज काम संपल्यानंतर डिझेल तेलाची टाकी पूर्णपणे भरावी.
5) ग्रीस गनच्या साह्याने प्रत्येक ग्रीस निप्पलला ग्रीसिंग करावे.
6) ट्रॅक्‍टरची बॅटरी तपासून त्यातील डिस्टिल्ड वॉटरची लेव्हल बघून वॉटर टाकावे.
7) दररोज शेतामध्ये कामाला जाताना मागील व समोरच्या टायरमधील हवा तपासावी.

र आठवड्यानंतर किंवा 50 ते 60 तास काम केल्यानंतर : 
1) ट्रॅक्‍टरच्या पंख्याच्या बेल्टचा ताण तपासून घ्यावा.
2) बॅटरी साफ करावी. सेल्फ स्टार्टरचे बोल्ट तपासावेत.
3) ट्रान्समिशन तेलाची पातळी तपासावी. कमी असल्यास तेल टाकावे.
4) ट्रॅक्‍टरच्या मागच्या व पुढच्या चाकांचे नट व बोल्टची तपासणी करावी. ढिले असल्यास टाईट बसवावेत.
5) क्‍लच व ब्रेक पॅडल तपासावेत.

15 दिवसांनी किंवा 100 ते 125 तास काम केल्यानंतर :
1) ट्रॅक्‍टरचे इंजिन ऑइल बदली करावे.
2) ऑइल फिल्टर रॉकेलने साफ करून कोरडा करावा. त्यानंतर ऑईलने भरून जोडावा.
3) एअर क्‍लिनर साफ करावा.
4) धुराच्या नळीतील कार्बन साफ करावा.

दर महिन्याने किंवा 200 ते 250 तास काम केल्यानंतर : 
1) ट्रॅक्‍टरचे इंजिन ऑईल काढून चेंबरची साफसफाई करावी. ऑईल फिल्टर बदलावा. नवीन ऑईल लेव्हलपर्यंत टाकावे.
2) प्राथमिक डिझेल फिल्टर साफ करावेत.
3) हायड्रोलिक व ट्रान्समिशन हाऊसिंगमधील ऑईल पातळी तपासावी.
4) डिझेल पंपामध्ये ऑईल सोडावे.

ट्रॅक्‍टर दीर्घकाळ चांगला चालण्यासाठी वेळोवेळी देखभाल व योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे.

 दर 450 ते 500 तास केल्यानंतर :
1) क्रॅककेसमधील हवा, नळी खोलून साफ करावी.
2) रेडिएटरमधील पाणी काढून ते स्वच्छ करून त्यात परत स्वच्छ पाणी भरावे.
3) ट्रॅक्‍टरच्या पुढील चाकांमध्ये अदलाबदल करावी.
4) डिझेल टाकी काढून साफ करावी.
5) पुढील चाकांच्या बेअरिंगला ग्रीस करावे.

 दर 750 ते 1000 तास काम केल्यानंतर : 
1) ट्रान्समिशन तेल बदलावे.
2) इंजिनमधील व्हॉल्व्हचे टायमिंग तपासून पाहावे.
3) स्टेअरिंग बॉक्‍समध्ये तेल प्लगच्या पातळीपर्यंत आहे का ते तपासून पाहावे.
4) ट्रॅक्‍टरचे वायरिंग तपासावे.
5) डिझेल फिल्टर बदलावेत.
6) ट्रॅक्‍टरची बॅटरी तपासून पाहावी. डिस्चार्ज झाली असेल तर ती चार्जिंग करून घ्यावी. आवश्‍यकता पडल्यास बदलावी.
दर 1000 ते 1200 तास काम केल्यानंतर
1) ऑइल फिल्टर बदलावेत.
2) हायड्रोलिक व ट्रान्समिशन ऑईल बदलावे.
3) स्टिअरिंग गिअर बॉक्‍समधील ऑईल बदलावे.
4) इंजिन खोलून सिलोंमधील कार्बन साफ करावा. टॉक तपासून पाहावा.
5) पुढील लहान चाकांची बेअरिंग काढून रॉकेलने साफ करावी. परत त्यात ग्रीस भरून बसवावीत.
6) ट्रॅक्‍टर चालू करून तपासून पाहावा. चाकाचे व इतर सर्व नटबोल्ट, ब्रेक ऑईल, मीटर व आर्मिचर बेअरिंगमध्ये ऑईल सोडावे.
7) दोन्ही ब्रेक तपासावेत.
8) स्पिंडल व इतर ज्या ठिकाणी ग्रीस निप्पल आहेत त्या ठिकाणी ग्रीस जाते का ते पाहावे.
9) वॉटर कूलिंग सिस्टिमधील पंप तपासून पाहावा.

ट्रॅक्‍टर चालकाने घ्यावयाची काळजी
1) ट्रॅक्‍टर चालू करण्यापूर्वी गिअर न्यूट्रलमध्ये आहे का ते पाहावे.
2) किल्ली ट्रॅक्‍टरला लावून कोठेही जाऊ नये.
3) ट्रॅक्‍टर उतारावरून चालविताना ट्रॅक्‍टर लो गिअरमध्ये चालवावा. कधीही क्‍लचवर पाय देऊ नये किंवा न्यूट्रल करू नये.
4) ट्रॅक्‍टर उतारावर किंवा चढावर उभा करत असताना तो फक्त गिअरमध्ये उभा न करता त्यास हॅंडब्रेक लावावा.
5) मागील मोठे चाक पंक्‍चर झाल्यास ट्रॅक्‍टर जागेवरून हलवू नये. त्याच ठिकाणी चाक ट्रॅक्‍टरपासून वेगळे करावे.
6) रेडिएटरमध्ये खारट व अशुद्ध पाण्याचा वापर करू नये.
7) अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्‍टर संथगतीने चालवावा.
8) हायड्रोलिक सिस्टिममधील पोझिशन कंट्रोलचा नेहमी वापर करू नये.
9) हायड्रोलिकच्या साह्याने इतर जड वस्तू ओढू नये.
10) वळताना ट्रॅक्‍टरचा वेग कमी करावा.
11) ट्रॅक्‍टर जास्त वेळ एकाच ठिकाणी उभा करावयाचा असल्यास हायड्रॉलिकला जोडलेले अवजार खाली जमिनीवर टेकवावे.
12) अवजारे ट्रॅक्‍टरला जोडताना ट्रॅक्‍टर आणि अवजारामध्ये उभा राहू नये.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment