10 रुपयात थाळी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी


राज्यातील गोरगरीब जनतेसाठी 10 रुपयात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 

ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये 6 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

 10 रुपयात थाळी : 
▪ 30 ग्रॅमच्या दोन पोळ्या
▪ 100 ग्रॅम भाजीची वाटी
▪ 150 ग्रॅम मूद असलेला भात
▪ 100 ग्रॅम वरण

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर 50 ठिकाणी हे शिवभोजन मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment