साने गुरुजींचे प्रेरणादायी विचार

 
● आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.
● आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.

● आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
● एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.

● कला म्हणजे परमोच्च ऐक्य.

● कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.

● कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.

● जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.

● ज्यांच्याकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.

● जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.

● ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.

● दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते. 

● ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.

● ध्येय सदैव वाढतच असते. 

● निर्बालांना रक्षण देणे हीच बाळाची खरी सफलता होय.

● निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.

● प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.

● प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment