तुम्हाला पेनकिलर्सचं व्यसन आहे?

दोस्तांनो, व्यसन कधीही कशांचही असू शकतं आणि कोणतंही व्यसन वाईट! सतत पेनकिलर्स घेणं हे सुद्धा व्यसनचं. जरा कुठे दुखायला लागलं की, पेनकिलर घ्यायची असा अनेकांचा शिरस्ता असतो. हे कितपत योग्य आहे. यावर एक नजर टाकूयात...

                             

1) पेनकिलरवर इतकं अवलंबून राहण्याचा संबंध मानसिकतेशी असतो. पण यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्यासोबत नातेसंबंध, नोकरीमध्येही समस्या निर्माण होतात.
 
2) वय, आसपासचं वातावरण, वैयक्तिक आरोग्य यामुळे आपण एखादं औषध वरचेवर घेऊ लागतो आणि त्याचं रूपांतर व्यसनात होतं.
 
3) पेनकिलरमुळे आराम मिळतो. त्यामुळे व्यक्तिच्या मूडमध्ये बदल होतात. रोजच्या जबाबदार्‍यांना दुय्यम स्थान दिलं जातं.
 
4) बरं झाल्यानंतरही काही जण औषधं घेत राहतात. अशा व्यक्ती औषधं घेण्यासाठी सतत डॉक्टराकडे जातात. डॉक्टर औषधं नसल्याची त्यांची तक्रार असते. ते चिडचिड करू लागतात.
 
5) अशा व्यक्तिंना आपलं व्यसन उघड होईल असं वाटू लागतं. यामुळे वागणुकीत बदल होतो. अशा व्यक्तिंना सतत विस्मरण होत राहतं. या व्यक्ती जास्त संवेदनशील बनतात.

तुम्हाला असं व्यसनं लागलंय का? सारख्या पेनकिलर्स घेताय का? तर मग पेनकिलर्सचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे पेनकिलर्स किंवा इतर कोणत्याही औषधाची सवय लागू देऊ नका.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment