अल्माटी: कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ते दोन मजली इमारतीवर आदळले. या दुर्घटनेत विमानातील 7 प्रवाशी ठार झाल्याची माहिती आहे. विमानातून 100 जण प्रवास करत होते.
याबाबत मिळालेल्या माहितनुसार, अल्माटी इथून विमानाने उड्डाण केले. यामध्ये 95 प्रवाशी आणि 5 क्रू मेंबर होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते दोन मजली इमारतीला धडकले. हे विमान कोणत्या कंपनीचे होते हे समजू शकलेले नाही. घटनास्थळी आपत्कालीन यंत्रणा पोहचली असून बचावकार्य सुरू आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment